आशेचं झाड
काकांचा प्रवास Thiruvanatpuram कडून Thoothukudi कडे सुरू झाला.
वाटेत एक सुंदर मंदिर लागलं. मंदिरासमोर मोठ्ठं झाड होतं. त्या झाडावर असंख्य छोटे पाळणे बांधले होते.
काकांनी कुतूहलाने विचारलं तर पुजारी म्हणाले “हे आशेचं झाड आहे. मुलबाळ व्हावं म्हणून लोक इथे पूजा करतात आणि देवाकडे साकडं घालण्यासाठी हा छोटा पाळणा बांधतात“.
हे ऐकून क्षणभर वाटलं, आज कित्येक लाख लोक अवयवांच्या प्रतीक्षेत असह्य जीवन जगत आहेत. भारतासारख्या प्रगत देशात प्रत्येक १० हजार गरजू पेशंटच्या मागे फक्त नि फक्त १ अवयव दाता मिळतोय.
या सर्व लोकांच्यासाठी ReBirth सारखी संस्था एक “आशेचं झाडचं ” तर नाही का !
ReBirth सारखी संस्था अवयवदानाच्या प्रचाराचं नि प्रसारचं काम विविध मार्गाने अखंडपणे करीत आहे. Bharat Organ Yatra (B.O.Y.) हा यातला एक महत्त्वाचा उपक्रम!
आज B.O.Y. Tirunaveli इथं हॉटेल लारा इथं पोहोचली. आशेचं झाड
तिथे Sun TV, vendhar TV, news 7, Dharani TV, velicham TV, and Tamira web tv या TV चॅनेल्स नी काकांची मुलाखत घेतली. 1 फेब्रुवारीच्या पेपर्स मध्ये आणि TV channels वर ReBirth च्या या कामाचं आणि काकांच्या bike वरून प्रवास करीत प्रचार करण्याच्या मनोधैर्याचं खूप कौतुक झालं.
Nellai Riders च्या NM Subramanian, Velmurugan, Kasirajan, Durai Nambi आणि Udayakumar यांचं ReBirth च्या या उपक्रमात मोठ्ठ सहकार्य मिळालं.
आपण या महान कार्यात आपापल्यापरीने खारीचा वाटा उचलूयात नि या झाडाच्या आशा पल्लवित करूयात !!
Let’s pray; no patient has to wait for organs!
अवयावदनाच्या या महान कार्यासाठी स्वतः प्रेरीत होऊयात आणि दुसऱ्यांनाही प्रेरीत करूयात !
आणि बनूयात कोणा गरजवंतासाठी
एक ‘आशेचं झाड ‘ !!!
~अस्मिता फडके– ताटके
Add Comment