अँड प्राईज गोज टू ….

दिनांक एक सप्टेंबरची मुक्तांगण मधील संध्याकाळ. अवर्णनीय आणि अविस्मरणीय. रिबर्थ ग्रीन काॅरीडाॅर च्या शाॅर्ट फिल्म 2024 वर्षांची स्पर्धा.खरचं या फिल्म स्पर्धेमुळे थिएटर मधील सर्व वातावरण भारावून गेले होते.आणि ही स्पर्धा होती अत्यंत आजच्या जीवनातील निगडित संवेदनशील अवयवदान विषयावरची.ऊद्देश एकच अवयवदाना विषयी ची जागृती.


आपण स्वतः खूप वाचत असतो.बघत असतो.ऐकत असतो.आपल्याला या गोष्टींसाठी खूप वेळ द्यावा लागतो.परंतु यासाठीच रिबर्थ संस्थेने शाॅर्ट फिल्म हे माध्यम हातात घेतले आहे.शाॅर्ट फिल्म द्वारा तीन ते पाच मिनिटात त्यातून सर्व आशय व्यक्त होतो.आणि त्यातील गर्भितार्थामुळे प्रत्येक जण मनांत अंतर्मुख होऊन विचार करु लागतो.खरचं शाॅर्ट फिल्म ची ताकद अतुलनीय आहे.त्यामुळे अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी यासाठी रिबर्थ संस्थेमधील प्रत्येकाचे कौतुक करतो.


या सोहळ्यामध्ये (स्पर्धेमध्ये) बाहेरील राज्यामधील, शहरामधील आणि गावामधील फिल्म बघायला मिळाल्या.खरचं त्यातील मूळ कल्पनांचा शांतपणे विचार केला तर मनांत भावनांचा वादळवारा सुटतो.आणि मन एकदम सुन्न होते.प्रत्येकाला वाटतेय मला त्या गोष्टींचे काय करायचे.परंतु ते तुफान तुमच्या घरात कधी घोंघावत शिरेल याचा नेम नाही.म्हणूनच प्रत्येकानेच या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे.


या फिल्म तयार करणाऱ्या निर्मात्यांचे,दिग्दर्शकांचे,संगीतकारांचे आणि कलाकारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.


खरचं या स्पर्धेच्या कप्तान त्यांचा संघ आणि रिबर्थ संस्थेच्या सर्व सभासदांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते.आणि विशेष कौतुक कप्तान ममता शहा यांचे करावेसे वाटते.कारण तीन महिने अविरत कष्ट आणि प्रयत्न करुन एवढा देखणा सोहळा त्यांनी आयोजित केला.त्यांचे अभ्यासपूर्ण भावस्पर्शी भाषण,वक्तृत्वयुक्त वाक्ये वाखाणण्यासारखी होती.


आणि शेवटी नाही म्हणले तरी या सर्व कार्यक्रमाचे आधारस्तंभ आणि पडद्यामागील सूत्रधार राजेश शेट्टी यांचे कौतुक करायलाच पाहिजे.

आणि म्हणूनच मी रिबर्थ संस्थेचा सभासद आहे याचा मला गर्व वाटतो.


शब्दांकन – अजित वंजारे

X