असाधारण प्रवास

कधी कधी विचार करताना जाणवत, की ह्या महाराष्ट्राच्या भूमीत वेगवेगळ्या क्षेत्रातली किती असाधारण अशी माणसं होऊन गेली किती संत पुरुष, किती लढवय्ये, किती समाजसुधारककित्येकदा अस वाटत की आपण गणती करायला बसलो तर आपली आखी हयात निघून जाईल पण ही गणती संपणार नाही…  

महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, महाराष्ट्र हे सामाजिक संस्थेचे मोहळ आहे. अशीच एक सामाजिक संस्था 5 वर्षा पासून केवळ आणि केवळ फक्त अवयव दानाचे महत्व सांगण्यासाठी अस्तित्वात आली. अवयव दानाचे महत्व लोकांना शब्दात पटवून देण म्हणजे महाकठीण, खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलणेच हे, परंतु हे आव्हान स्वीकारणारा एक मनुष्य ह्या अंजन कांजन करवंदिच्या महाराष्ट्रात निघालाच

चांगल्या अर्थाने अवयव दानाचे वेड डोक्यात घेऊन गाडी वर स्वार होऊन भारताला गवसणी घालणाऱ्या ह्या तुफानाचे नाव श्री. प्रमोद लक्ष्मण महाजन.

 वय – ६८ वर्षे, व्यवसायशेती

आजपर्यंत शेती किंवा शेतकरी म्हटलं की आपल्या समोर उभा राहतो तो बैलगाडीवर स्वार झालेला, नेहरू टोपी, धोतर आणि पांढरा सदरा घातलेला मनुष्य.

पण ह्या काकांना भेटल्यावर त्या सर्व गोष्टींना तडा जातो आणि समोर उभा राहतो हा आधुनिक विचार असलेला, बैलगाडी सोडून 2 चाकी अगदी आनंदाने चालवणारा हा सांगली जिल्ह्यातील रांगडा गडी.

जो निघालाय ReBirth संस्थेचा मावळा बनून organ donation चे धडे देयला अवघ्या भारतभर

ReBirth संस्था आणि Mileage Munchers ह्या दोघांनी सैयुक्तरित्या काका साठी संपुर्ण भारतभर बनवलेली मोहीम तीच नाव भारत ऑर्गन यात्रा (B.O.Y. 2.0) आतापर्यंत आपल्याला ह्या प्रवासाची माहिती आधीच्या सर्व ब्लॉग्स मधून मिळाचीच आहे

काही इतर कामा निमीत्त दूरध्वनी द्वारे काकांशी बोलण्याचा योग् आला आणि हा प्रवास किती अवघड असू शकतो ह्याची प्रचिती आली

खरंतर भुबनेश्वर ते बालासोर अंतर गाठण्यासाठी फक्त .३० तासांचा अवधी लागतो. सकाळी .३० वाजता सुरू झालेला हा प्रवास अतिशय खडतर रस्ते प्रवासा दरम्यान आलेले प्रचंड खड्डे, एकेरी वाहतूक, धो धो पाऊस अश्या सगळ्या गोष्टीवर मात करून कुठल्याही गोष्टींची तमा बाळगता केवळ दुसऱ्या शहरात पूर्व नियोजित कार्यक्रमला पोहचायची तळमळसकाळी संपणारा हा प्रवास दुपारी वाजेपर्यंत चालू राहिला. प्रवासा दरम्यान रस्त्यांची दुरावस्था असल्याने काका दोनदा पडता पडता वाचले! हा सर्व प्रवास थक्क करणारा होताहे सगळं ऐकल्यावर आजूबाजूचं काही सुचेनासे होते… 

इथे हरिवंश राय बच्चन ह्यांचा  कविताच्या ओळीं आठवताततू ना रूकेगा कभी; तू ना थमेगा कभी

 ह्या महान कार्याला आणि ह्या सांगलीच्या माणसाला, ज्या सांगलीला देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची मोठी पार्श्वभूमी आहे, ह्या अवयव दानाच्या निस्वार्थी कार्याला शतशः प्रणाम पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!

Day 045
Bhubaneswar to Balasore | 196 kms

– कौस्तुभ वामन जोशी
   Professional Baker
   ReBirth Volunteer

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

X