दैवबळ, संयम आणि निर्धार

आज ८ फेब्रुवारीला काका इरोड वरून निघून २१० किमी अंतर पार करून म्हैसूरला पोहोचले. प्रवास थोडा कठीण होता. वाटेत रहदारी जास्त होती, रस्ता वळणा वळणाचा होता आणि मुख्य म्हणजे ७–८ किलोमीटरचं अंतर दाट जंगलातून पार करायचं होतं! ट्रॅफिक ची रांग लांबपर्यंत होती. विचारणा केली तेव्हा काकांना कळलं , एक हत्ती वेळू तोडून, रस्ता अडवून थांबला आहे आणि म्हणून ट्रॅफिक थांबलं आहे. काकांना म्हैसूर खुणावत होतं, उशीर होत चालला होता. बऱ्याच वेळाने तो हत्ती एकदाचा बाजूला झाला आणि काका थोड्या जास्त वेगाने पुढे निघाले.

चांगल्या गोष्टी घडण्यासाठी निर्धार आणि संयम यांची जोड कायम असावी लागते. मग आपोआपच दैवबळ पाठीशी उभं राहतं.

म्हैसूर या शहराचा इतिहास आपल्याला हेच शिकवितो.
महिषासूराचा वध करून देवी चामुंडेश्वरीने असूरी सत्ता संपविली आणि म्हैसूरमध्ये सुराज्य आलं. अशी पार्श्वभूमी आणि दैवबळ लाभलेल्या शहरात पाऊल ठेवताना ReBirth च्या B.O.Y. चा विश्वास द्विगुणित नसता झाला तरच नवल!

परंपरा आणि सामाजिक भान जपणाऱ्या या शहराने काकांचं म्हैसूर मध्ये जंगी स्वागत केलं!
काका पोहोचताच मीडिया ने पत्रकार भवन येथे काकांची मुलाखत घेतली, गाडीची ride आणि ReBirth चा संदेश टिपून घेतला.

एव्हाना दुपारचे २ वाजून गेले होते. Mr कौशिक आनंद (solo rider) हे काकांचे म्हैसूर मधले host. ते काकांना घरी जेवायला घेऊन गेले आणि थोड्या विश्रांती नंतर लगेचच दुसरा इव्हेंट होता – म्हैसूरच्या प्रसिद्ध ‘अपोलो’ (Apollo BGS Hospital) हॉस्पिटलमध्ये!

अपोलो BGS हॉस्पिटलच्या Dr Raghavendra M (Consultant Urologist), Dr Rajkumar P Wadhwa (Senior Consultant Gastroenterologist), Dr Srinivas Naloor (Senior Consultant Nephrologist), Dr Praveen Chandrasekhar (Consultant Nephrologist) यांनी काकांचं मनापासून स्वागत केलं.

Medical college चे विद्यार्थी, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ हे सर्व काकांची स्टोरी आणि ReBirth च्या माध्यमातून करीत असणारे काम पाहून थक्क झाले. उत्तम प्रतिसाद मिळाला.

कौशिकजी खूपच खुश होते. काकांबद्दल आणि ReBirth बद्दल भरभरून बोलत होते. काकांची organ donation चा संदेश देणारी bike चालविण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही. गाडी घेऊन ते जेव्हा पेट्रोल पंपावर गेले, तेव्हा लोक कुतूहलाने त्यांच्याकडे पहात होते आणि organ donation बद्दल त्यांना विचारत होते.

काही सुशिक्षित लोकांनी काकांना प्रश्न विचारला,

‘आपल्या एवढ्या प्रगत देशात अवयवदान जनजागृती साठी अश्या प्रवासाची खरंच गरज आहे का?’ यावर काकांचं उत्तर फार मार्मिक होतं, ‘स्वच्छ भारत अभियानासाठी मोदीजींना झाडू हातात घ्यावा लागतो, मग Organ Donation सारख्या अवघड विषयाच्या प्रचारासाठी आपल्याला किती प्रयत्न करायला हवेत?’

ReBirth चे अथक प्रयत्न आणि मिळेल त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत Organ Donation चा संदेश पोहोचण्याचा ध्यास हे एकच ध्येय!
चला आपणही हा निर्धार करूयात!

Day 22
Erode to Mysore | 210 kms

~अस्मिता फडके –ताटके

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

X