देणाऱ्याने देत जावे
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे! ~ विंदा करंदीकर
जर तुम्हाला कोणी सांगितले, की मृत्यूनंतरही जीवन आहे आणि आपण ते जाताजाता कोणा नशीबवंताच्या झोळीत दान करून जाऊ शकतो; तर ते कित्येकांना खरे वाटणार नाही!
पण हे शक्य आहे!
मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान झाल्यास ती व्यक्ती जाता जाता ८ लोकांना जीवनदान देऊन जाऊ शकते!
अवयावदानाचा हाच संदेश घेऊन आज महाजन काका बेंगलोरला पोहोचणार होते!
काका १२:३० च्या सुमारास बेंगलोरला पोहोचले आणि Jeeva Sarthakathe च्या संपूर्ण टीम ने त्यांचे खूप मनापासून स्वागत केले!
Jeeva Sarthakathe ही कर्नाटक सरकारच्या आखत्यारीत Organ Donation च्या क्षेत्रात काम करणारी अशीच एक नावाजलेली संस्था!
Organ Donation च्या प्रचारासाठी ReBirth तर्फे भारतभर प्रवासाला निघालेल्या महाजन काकांना पाहण्याची आणि भेटण्याची उत्सुकता सर्व टीमच्या चेहऱ्यावर दिसत होती. Jeeva Sarthakathe चे डॉ. फडके, मंजुळा मॅडम, श्री स्वामी यांनी त्यांच्या कार्यालयात काकांचे स्वागत केले.
नंतर लगेचच SSNMC Hospital मध्ये काकांच्या स्वागताप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजीत केला होता. श्री स्वामी काकांना घेऊन आले तेव्हा डॉक्टर्स आणि ६०–७० स्टाफ मेंबर्स या कार्यक्रमाला आवर्जून जमले होते.
काकांच्या तोंडून या अनोख्या ‘भारत ऑर्गन‘ यात्रेतील अनुभव ऐकताना सर्वांच्याच मनात कुतूहल आणि अभिमानाची भावना होती.
अवयवदाता आणि अवयव घेणारा यात जात, धर्म, प्रांत, पैसा यांच्या पलीकडचं, केवळ आणि केवळ ‘मानवतेचं‘ नातं असतं!
हे घडून यावं म्हणून जनजागृतीचा वसा घेतलेल्या दोन संस्था आज एकमेकांशी मनमोकळ्या गप्पांमध्ये दंग झाल्या होत्या!
काकांनी स्वतः एका जवानाला किडनी दान केल्याचं ऐकून सगळेचजण थक्क झाले.
काकांचा SSNMC Hospital मधील कार्यक्रम उत्तम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर काका हॉटेल कडे जायला निघाले.
आज काकांना receive करण्यापासून ते हॉटेल पर्यंत परत सोडण्याची जबाबदारी bikers group चे श्री. ज्योतिष बाबू यांनी सलीम नावाच्या मुलाकडे सोपविली होती.
हा मुलगा दुपारपासून काकांची सोबत करीत होता, हरप्रकारची मदत करीत होता, बोलायला एकदम मनमोकळा आणि वागणं एकदम प्रेमाचं!
काकांच्या मनात विचार रेंगाळत होते.
कोण कुठली माणसं, कुठले हे ऋणानुबंध!
अशीच निरपेक्ष भावना आपणही जागृत करूयात आणि Organ Donation च्या बाबतीतही एक प्रार्थना करूयात…
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
जात जाता जाणाऱ्याने;
आपुले अवयव दान करावे!
Day 24
Mysuru to Bengaluru | 145 kms
– Asmita Phadke – Tatke
Add Comment