‘देणे समाजाचे’ महोत्सव
10:00 September 20, 2019 to 21:00 September 22, 2019
रीबर्थ बूथ, 'देणे समाजाचे' महोत्सव *तारीख- २०,२१,२२ सप्टेंबर* *वेळ -सकाळी १० ते रात्री ९* *स्थळ -हर्षल हॉल, कर्वे रोड, पुणे* *मरावे परी अवयवरुपी उरावे* ReBirth अर्थातच पुर्नःजन्म. या एका शब्दातच त्याचं महत्त्व जाणविल्याशिवाय रहात नाही. 'आपणही कोणालातरी असाच पुर्नःजन्म देऊ शकतो' या संकल्पनेविषयी जनजागृती करणारी एक संघटना म्हणजे ReBirth.. अवयव दान या महान कार्याचा प्रचार नि प्रसार करणारी ही एक संस्था. अवयवयांची प्रतीक्षा करणारे गरजू आणि अवयव दाता यांचे प्रमाण १००००:१ इतके व्यस्त आहे. अवयवदान ही काळाची गरज आहे.ह्या विषयी आपणास पुरेशी माहिती आहे का, अवयव दान कसे होते, ते कोण नि कधी करू शकतो, या विषयी आधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही आम्हाला आवश्य भेट द्या. ' *देणे समाजाचे'* या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या प्रदर्शनातील ReBirth च्या बूथ वर आवश्य भेट द्या तर मग येताय ना? आम्ही वाट बघतोय.. - टीम रीबर्थ.
X