आयुष्याचं सोनं करण्याऱ्या दोन गोष्टी
जिद्द आणि चिकाटी
कोई लक्ष्य इन्सानके साहस से बडा नही।
और हारा वही इन्सान जो कभी लढा नही।।
मत पूछो की मेरी मंझिल कहा है
अभी तो चलनेका इरादा किया है
आजचा एकूण प्रवास – २८० कि.मी.
सायकलवरील एकूण वेळ – जवळ जवळ १७-१८ तास
आतापर्यंतचा एकूण प्रवास – १८०० कि. मी.
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे- सागर, लिंगा, नरसिंगपुर
आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेशाचा काही भाग
चौथ्या दिवशी वातावरणात सकाळी थोडा गारवा होता पण जसा जसा दिवस वर चढत गेला वातावरणात उष्णता वाढायला लागली. प्रिती प्रत्येक वेळी विश्रांतीसाठी थांबली की तिचे जाकिट आणि टोपी पाण्याने ओली करुन घालत होती.
रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने चालवण्यास तुलनेने सोपा होता. ऊन असले तरी ओल्या कपड्यांमुळे थोडेसे सुसह्य झाले होते. एकदम थंड प्रदेशातून उष्ण वातावरणात आल्याने शरीराला जुळवून घेण्यास थोडा वेळ गेला.
रस्ता महामार्ग असल्याने रहदारी भरपूर होती. प्रितीच्या सुरक्षिततेसाठी, इतर वाहनांना सूचना देण्यासाठी टिमने एका गावात दोन लाल झेंडे विकत घेतले. आणि त्यांचा वापर करुन प्रितीसाठी पुढचा रस्ता सायकल चालवण्यास मदत झाली.
दिवस सरला आणि संध्याकाळ झाली.
काहीवेळाने प्रितीला लक्षात आले की तिचा डावा गुडघा दुखत आहे. तिने नी कॅप (Knee- cap) घातली. तरीही गुडघेदुखी काही कमी झाली नाही. मग तिने वेदनाशामक औषध घेतले पण फारसा फरक पडला नाही. तीने रात्रभर दुखऱ्या गुडघ्याने सायकल चालवली. जेव्हा जेव्हा जास्त त्रास झाला तेव्हा थांबून विश्रांती घेतली.
एक वेळ अशीही आली की तिला सायकल धरून पायी चालायला लागले. टिम ने औषधी मलम लावले आणि ती सायकलवर स्वार झाली. पहाटे चारच्या सुमाराला तिने विश्रांती (झोप) घेण्याचे ठरवले. तिनेक तासाच्या आरामानंतर तिला बरे वाटू लागले आणि सकाळी सातच्या सुमाराला सायकल प्रवास पुन्हा सुरु झाला. टिमने वेदनाशामक औषध आणि मलमाची सोय केली आहे. आता लवकरात लवकर नागपूरला पोहचणे हे लक्ष्य आहे.
अथक सायकलिंग, अपूरी झोप, परीश्रमाच्या मानाने कमी आहार, तापमानातील अचानक झालेला बदल या सगळ्या कारणांमुळे तिच्या कामगिरीवर नक्कीच थोडा परिणाम झालेला टिमला लक्षात आला आणि त्त्यांनी तिच्या आहारतज्ञाशी सल्लामसलत केली आहे आणि त्यावर सुचवल्या गेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल.
इतरवेळी सायकलस्वार कदाचित निसर्ग, आजूबाजूचे मनोहर दृश्य बघेल, थोडं थांबू शकेल, गाणी ऐकेल पण प्रितीने एक अत्यंत अवघड कामगिरी हातात घेतली आहे आणि त्यात तिला तिच्या ध्येयाखेरीज काही दिसत नाही. तिला फक्त दिसत आहे अवयवदान न होऊ शकल्याने रुग्णांची होणारी वाताहात. आणि तिची मोहीम हि जनजागृतीकरिता आहे म्हणून अर्जुनाप्रमाणे तिची नजर एकदम स्थिर आहे आणि ती आपल्या लक्ष्याचा वेध घेण्यास तयार आहे.
हाँ यही रस्ता है तेरा
तूने अब जाना है
हाँ यही सपना है तेरा
तूने पहचाना है
हाँ यही रस्ता है तेरा
तूने अब जाना है
हाँ यही सपना है तेरा
तूने पेहचाना है
तुझे अब ये दिखाना है
रोके तुझको आँधियाँ
या ज़मीन और आसमां
पायेगा जो लक्ष्य है तेरा
लक्ष्य तो हर हाल में पाना है
शब्दांकन – कविता पिपाडा