मैं हूँ ना!

इच्छा असेल तर मार्ग दिसेलया उक्तीला साजेसा आजचा दिवस B. O. Y. च्या प्रवासात घडला

कालच्या बेंगलोरच्या हृद्य आठवणी मनात साठवून काका १२ फेब्रुवारी ला सकाळी लवकरच सालेमच्या दिशेने निघाले. बेंगलोरचा सलीम highway पर्यंत रस्ता दाखवायला काकांसोबत होताच

आता पुढचा टप्पा सालेम! प्रवास लांबचा होता. 203 km चं अंतर पार करायचं होतं. Dr. J.R. Gopikrishnan (Retroriderz group) काकांचे सालेम मधील host होते

काका थेट सालेमला जाऊन पोहोचले आणि त्यांना कळलं की त्यांचं destination सालेम च्या अलीकडेच 25–30 km Tharamangalam या छोट्या गावी आहे. काकांच्या गाडीने U-turn घेतला आणि काका Tharamangalam ला 2:30 pm च्या दरम्यान पोहोचले

गाव तसं छोटंच! Dr. J.R. Gopikrishnan यांनी काकांचं स्वागत केलं आणि त्यांना स्वतः च्या घरी घेऊन गेले. Dr. Gopikrishnan यांची Tharamangalam मध्ये स्वतःची छोटी प्रॅक्टिस आहे. तामीळ आणि इंग्लिश भाषा उत्तम बोलतात. हिंदी फारसं कोणालाच कळत नव्हतं. काकांना इंग्लिश दोन चार शब्दांपालीकडे येत नव्हतं. Communication हा सगळ्यात मोठ्ठा अडसर आहे हे काकांना पहिल्या भेटीतच लक्षात आलं.

हरकत नाही. काहीतरी मार्ग नक्की निघेल

काका जमेल त्या शब्दात Gopikrishnan शी संवाद साधत होते. कधी हातवारे करून तर कधी गाडीवरचे slogans दाखवून!

गाव छोटं असल्याने, इथे काही मोठ्ठा कार्यक्रम planned नव्हताच. काकांनी Gopikrishnan ना request केली की कोणी न्युज पेपर्स चे लोक असतील तर उद्या मुलाखत घेता येईल का पहा.

Gopikrishnan यांनीही खटपट करून 2-3 रिपोर्टर्स ना बोलावून घ्यायचं आश्वासन दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता interview ठरला

रात्री काकांशी फोनवर बोलले तेव्हा हा सगळा वृत्तांत कळला. Gopikrishnan यांच्याशी बोलणं झालं तेव्हा कळलं, मुख्य अडसर आहे भाषेचा!

मग मी Gopikrishnan ना एक request केली
If kaka can’t communicate, why don’t you attempt to talk on his behalf? 
He immediately agreed. 

आमची ReBirth ची प्रेझेंटेशन PPT त्यांना पाठविली आणि एक एक slide समजावून सांगितली.

त्यांना इतक्या details मध्ये organ donation बद्दल माहिती नव्हती. ते स्वतः खूप प्रभावीत झाले आणि उद्याच्या न्युज coverage वेळी सर्व माहिती तमीळ मध्ये सांगण्याचं आश्वासन दिलं!

Gopikrishnan हे ओघानेच आमच्या ReBirth संस्थेशी जोडले गेले आणि ReBirth ला आज त्यांच्या रूपानं Tharamangalam येथे नवा कार्यकर्ता मिळाला… 

Now we all are awaiting tomorrow’s event!

 It is Gopikrishnan’s first presentation on behalf of ReBirth!

Gopikrishnan पण खूप आतुरतेने वाट पहात आहेत उद्याच्या event ची!

काकांच्यासाठी त्यांनी आज छान जेवण बनवलंय. दोघे सांकेतीक भाषेत संवाद साधत आहेत. कदाचित उद्याच्या presentation ची तयारी करीत आहेत.

Gopikrishnan आश्वासक होऊन काकांना सांगत आहेत.. Don’t worry kaka. मैं हूँ ना!

Day 26 
Bengaluru to Salem | 203 kms
Asmita Phadke – Tatke

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

X