माझे ध्येय भरी पंखात बळ माझ्या !!

एकूण प्रवास – १५० किमी

सायकलवरील अंदाजे वेळ – १० -११ तास

पार केलेली राज्ये – सप्तरी जिल्हा,सीरहा, उधना

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – सीतापूर, कल्याणपूर, पनेसरा

सकाळी सव्वा पाचच्या सुमाराला प्रितीने महुलीहून काठमांडूच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली. ह्या रस्त्यात बराच चढ होता आणि रस्ता खराब हि होता. सतत खाचखळग्यातून सायकल जात असतांना धक्के बसून प्रितीची बॅग खाली खाली येत होती. बॅग चिखल मातीने खराब झाली. काही वेळाने बॅग तुटली आणि तिला घेऊन चालणे अवघड झाले.

दुपारी दिडच्या सुमाराला तिला अचानक एक सायकल दुरुस्तीचे दुकान दिसले. त्या दुकानात बऱ्याच गिअरच्या सायकली होत्या त्यामुळे प्रिती तेथे थांबली. प्रितीची सायकलवारी आणि प्रवास पाहून मॅकेनिक थक्क झाला. अवयवदान या बद्दल त्याला माहीत पडल्यानंतर त्याने प्रितीचा पुढचा प्रवास सुखकर कसा होईल याचा विचार करुन दुरुस्ती करायला घेतली.

मॅकेनिकने सायकल दुरुस्ती तर करुन दिलीच त्याबरोबर न सांगता मडगार्ड लावून दिले जेणेकरुन चिखलमातीने टायर आणि कपडे, बॅग खराब होणार नाही. त्याच बरोबर त्याने कॅरियर लावले आणि बॅग पडण्याची शक्यता देखील मावळली. रस्त्यात तिला जेवण्ययोग्य ठिकाण दिसले नाही. जिथे जिथे फळे आणि शाकाहारी फराळ उपलब्ध झाला तिथे तिथे तिने थोडेसे खाऊन घेतले.

आता प्रितीचा प्रवास एकदम सुकर झाला आणि त्यात भर म्हणून की काय तिचा रस्ता घनदाट झाडींनी भारलेला होता. हा रस्ता जंगलातून जात होता, झाडी असल्याने उन्हाचा त्रास नव्हता, वातावरण अतिशय अल्हाददायक होते. रस्ता सलग चढ उताराने भरला होता पण आता आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहता पाहता कधी संध्याकाळ झाली हे प्रितीला कळलेच नाही. प्रिती म्हणते की इतका रमणीय होता की सगळा सकाळचा थकवा पळून गेला.

आता पुढचा रस्ता अत्यंत चढाचा आणि दोन अवघड घाटांतून जाणारा आहे.

पुढचा दिवस जरी आव्हनात्मक आहे तरी प्रितीचा उत्साह तीळमात्र देखील कमी झाला नाहीये.

एक चांगले ठिकाण पाहून प्रिती मुक्कामी थांबली. रस्त्यात येतांना जेवणसाठी एक चांगली जागा दिसली होती परत सायकलवर मागे गेली आणि तिथे भोजनाची उत्तम सोय होती. तिथे हि सगळ्यांना या सायकलस्वाराचे अत्यंत कौतुक वाटले आणि अवयवदानाच्या प्रसारासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी आणि खर्च केलेले उष्मांक (calories) भरून काढण्यासाठी मनसोक्त पनीरची भाजी आणि पोळी खाल्ली. अशा मोहिमांमध्ये क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहार व्यवस्थित घेणे गरजेचेच आहे हे प्रितीला ठाऊक आहे.

हि सगळी माहिती सांगतांना आमच्याबरोबर बोलत असतांना रात्रीचे नऊ वाजले होते आणि प्रिती पुढच्या दिवसच्या तिच्या प्लान बद्दल अतिशय उत्साहाने सांगत होती. सकाळी तीन वाजता उठून, चारच्या अगोदर मोहिमेला सुरवात करुन काठमांडूच्या जास्तीत जास्त जवळ जायचे. दुसऱ्या दिवशी थोडे काठमांडू फिरुन आपला आणि रिबर्थचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय लोकांना द्यायचा हा तिचा हेतू आहे.

काठमांडू नेपाळची राजधानी असल्याने तिथे थोडा जास्त वेळ थांबण्याचा तिचा मानस आहे. उद्या येणार दिवस कसा असेल? कोणती नवीन आव्हाने घेऊन येईल? कोणते नवीन अनुभव येतील? असे अनेक प्रश्न आहेत पण प्रिती उद्याच्या दिवसासाठी आणि नवीन आव्हानंसाठी साठी तयार आहे.

कुछ काम करो,

न मन को निराश करो

पंख होंगे मजबूत,

तुम सपनों में साहस भरो,

गिरोगे लेकिन फिर से उड़ान भरो,

सपनों में उड़ान भरो।

तलाश करो मंजिल की,

ना व्यर्थ जीवनदान करो,

जग में रहकर कुछ नाम करो,

अभी शुरुआत करो,

सुयोग बीत न जाए कहीं,

सपनों में उड़ान भरो।

उठो चलो आगे बढ़ो,

मन की आवाज सुनो,

खुद के सपने साकार करो,

अपना भी कुछ नाम करो,

इतिहास के पन्नों में अपना नाम दर्ज करो,

सपनों में उड़ान भरो।

कवी – नरेंद्र वर्मा

शब्दांकन – कविता पिपाडा

X