No worries, Not a doubt
Priti is just Peddling out!!

प्रयत्न आणि सातत्याची धरली कास,
अवयव दानाचा प्रसार, धरला हाच ध्यास,
या सायकलवारीचा यशस्वीतेचा सगळ्यांना विश्वास ॥

प्रितीचा नागपूरहून निघून तेलंगणात प्रवेश!
आता मिशन हैद्राबाद!!

सातव्या दिवसाचा एकूण प्रवास – ३८० कि.मी.
सायकलवरील एकूण वेळ – जवळ जवळ २२ तास
रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – हिंगणेघाट, पांढरकावडा, पेणगंगा पूल, इचोडा, निर्मल
आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र

सकाळी सात वाजेपर्यंत नागपूरच्या पेट्रोलपंपावर प्रितीने विश्रांती घेतली आणि नव्या आव्हानास सामोरे जाण्यास सज्ज झाली. हे नवे आव्हान होते प्रचंड ऊन आणि उष्ण वातावरण.

टिममध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. श्री सुनील कुकडे आणि रोहित मालवीय हे नवीन सदस्य आले आहेत. मोहनजी हे रेल्वेने चेन्नईला गेले आहेत. ते विश्रांती घेतील आणि चेन्नईला परत टिममध्ये येतील.

सुदैवाने प्रितीची गुडघेदुखी थांबली आणि तिचा वेगही पूर्ववत झाला आहे. उन्हाचा तडाखा जाणवत होता पण प्रिती दिवसभर दुपारचे जेवण सोडल्यास कोठेही थांबली नाही.

टिम तिला उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी लिंबू-पाणी, नारळ-पाणी सतत देत आहे. तिला शरीरातील पाणी वाढवणे गरजेचे असल्याने वेळ पडल्यास जबरदस्तीने पाणी पाजत आहेत. आज पहाटे तिने चार ते पावणेपाच एवढा वेळच विश्रांती घेतली आहे. आजपासून दुपारी थोडा वेळ विश्रांती घेऊन रात्री जास्तीतजास्त वेळ सायकल चालवण्याचा तिचा प्रयत्न असेल.

हि मोहीम अत्यंत कमी वेळात योजली गेली. अगदी महिना दिड महिन्यात सुरु ही झाली त्यामूळे उन्हात सायकल चालवण्याच्या सरावाला तिला वेळच मिळाला नाही.
थोडा आणखी वेळ मिळाला असता तर या प्रवासाला कदाचित वेळ ही कमी लागला असता.
हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत प्रिती कदाचित हैदराबादला पोहोचलेली असेल.

प्रितीच्या या अवयव दान प्रसार मोहिमेची नोंद नागपूरच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने घेतली आहे. तिच्याबद्दल एक लेख रविवारी प्रसारीत झालेल्या पेपरमध्ये देखील आला आहे. तिची एक छोटी मुलाखत नागपूरच्या रेडिओ सिटीवर सुद्धा लवकरच येत आहे.

प्रितीने आपला वेळ, श्रम, लक्ष्य, मेहनत सगळं एकाच ठिकाणी एकवटले आहे, तिचे हे ध्येय ती नक्कीच गाठेल.

कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

शब्दांकन – कविता पिपाडा

X