आव्हानांना मर्यादा नाही, मर्यादांना आव्हान!

एकूण प्रवास – २१५ किमी

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे- सुगोली, खुशीनगर, हाता, मथपर, गोरखपुर, खलिदाबाद

सांगोलीहून सकाळी सव्वा पाच वाजता प्रितीचा प्रवास सुरु झाला. भारताच्या हद्दीत आल्यानंतर फोनदेखील रेंजमध्ये आला होता. आता पुढचा प्रवास ओळखीच्या प्रदेशात आणि परिचित रस्त्यावरून होईल म्हणून प्रिती थोडी निश्चिंत होती.
पण प्रिती आणि अडचणी एक अनोखे नाते आहे. रस्ता मध्ये मध्ये खराब होता. सैडल बॅग कॅरिअर वरून निसटत काही वेळाने खाली आली आणि पडली. तिला थांबून बैग नीट करायला वेळ गेला. रोज बॅग बांधणे या कामासाठी तिला एक तास लागतो थोड्या वेळाने सायकल पंक्चर झाल्याचे लक्षात आले आणि प्रिती थांबली. सायकलचे पंक्चर काढून घेतले आणि पुन्हा प्रवासाला सुरवात झाली.

रस्त्यात पाऊस चालू झाला आणि ती रस्ता चुकली. परत गूगल मॅप बघणे, योग्य रस्ता शोधणे यात तिचा बराच वेळ गेला. प्रवास परत सुरु झाला आणि सायकल परत पंक्चर! सायकल नीट करण्यात परत वेळ गेला.
संततधार पाऊस चालूच होता. खुशीनगर आले, येथे खुशीनगरच्या रोटरी क्लबचे काही सदस्यांनी तिची सदिच्छा भेट घेऊन तिचा सत्कार केला. त्यांनी तिच्या मोहिमेचा उदेश्य जाणून घेतला. रिबर्थ आणि अवयव दानाबद्दल माहीत झाल्यावर ते खूप प्रभावीत झाले.

पुढे प्रवास चालू झाला. ती खलिदाबादला पोहोचल्यानंतर तिथल्या रोटेरीयन डॉ सोनी यांनी तिची भेट घेतली. त्यांनी सोनी इंटरनॅशनल या त्यांच्या हॉटेलवर प्रितीला जेवण्यासाठी घेऊन गेले.

त्यांची मुलगी तिच्या मुलाला खास प्रितीला भेटण्यासाठी घेऊन आली. त्यांननी प्रितीच्या मोहिमेबद्दल माहीत करुन घेतले आणि तिला तिच्या अवयव दानाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर

शब्दांकन – कविता पिपाडा

X