अब दिल्ली दूर नही।

एकूण प्रवास – २२८ किमी

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे – अयोध्या, हलियापूर, बिकापुर

सकाळचे ४ वाजले होते आणि आजचे प्रीतीचे लक्ष्य होते लखनौच्या १०० किमीपेक्षा जवळ आणणे. पण म्हणतात Man proposes but God disposes प्रिती ज्या घड्याळाच्या मदतीने रोजचे अंतर रेकॉर्ड करत आहे ती जर्मिन वॉच बंद पडली. ती काही चार्ज होईना. नवीन जे अंतर ती पार करेल ते नोंदवण्यासाठी तिने दुसऱ्या मोबाईलवर strava स्ट्रावा हे ऍप डाउनलोड केले. जर्मिन चा बाइक कंप्यूटर वापरायला सुरवात केली. पण यात तिचे दोन तास वाया गेले. ज्या हॉटेलमध्ये ती रात्री मुक्कामाला होती त्यांनी पहाटे उठून तिच्यासाठी न्याहरी बनवली. रस्त्यात खाण्यासाठी सँडविचेस दिले

प्रत्येक दिवशी काटलेले अंतर, एकूण अंतर याची नोंद असणे हे रेकॉर्डकरीता आवश्यक असते. जेव्हा जेव्हा सायकल पंक्चर झाली किंवा तिने चालत जाऊन मदत घेतली अस्वल तेव्हा तिला हे एक्स्ट्राचे अंतर मोजता येत नाही. काम झाल्यावर परत मागे जाऊन परत आपला प्रवास चालू करावा लागतो. अंतर मोजणे थांबवावे लागते.

रस्त्यात प्रितीने दिल्ली, बरेली, पुणे, मुंबई सगळ्या ठिकाणच्या सर्विस सेंटरला संपर्क केला पण तिचा प्रश्न सुटला नाही.

नवीन उप्करणांच्या मदतीने त्या दिवसाचे अंतर मोजता येत होते त्यामुळे प्रवास सुरु ठेवला. काही वेळाने सायकलचे टायर पंक्चर झाल्याचे लक्षात आले दोन किमी अंतर पायी जाऊन सायकल दुरुस्त केली, टायरमध्ये काचेचा तुकडा सापडला. आता पंक्चर काढून परत दोन किमी मागे जाऊन, घड्याळ स्वत करुन सायकल चालवायला सुरवात केली.

सकाळपासून बराच वेळ गेल्याने ती आता कुठे न थांबता निघाली. अयोध्येला पोहचून ती राममंदिरात दर्शनाला गेली. मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. फ़ोन आत नेण्यास परवानगी नाही. अयोध्येहून निघता निघता पाऊस चालू झाला. पण जो पर्यंत पावसात चालवणे शक्य आहे तो पर्यंत न थांबण्याचे तिने ठरवले. पाऊस सलग चार तास चालू होता.

संध्याकाळी ७वाजेच्या सुमाराला लखनौच्या ८० किमी अगोदर थांबून तिने संध्याकाळचे जेवण घेतले आणि पुढच्या प्रवासाला लागली. मुक्कामाच्या गावात लग्न असल्याने हॉटेल शोधण्यासाठी वेळ गेला पण एक चांगले हॉटेल मिळाले त्यांनी तिला सायकल रुमपर्यंत नेण्याची परवानगी दिली. सायकल आणि कपडे दोघांची अवस्था खराब झाली होती, त्यांना स्वच्छ धूऊन, सुकवून प्रिती झोपायला गेली.

सरफिरे मुसफिर है हम।
मांजिलोंकी की चाह नही सफर का शौक रखते है हम॥

शब्दांकन – कविता पिपाडा

X