ReBirth Invited by Directorate of Medical Education & Research, Mumbai
महाराष्ट्र शासन
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत
चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डीमेलो रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१
दुरध्वनीः+९१-२२-२२६२०३६१-६५/२२६५२२५१/५७/५९. टेलीग्राम: “MEDUCATNSEARCH फॅक्स:+९१-२२-२२६२०५६२/२२६५११६८ संकेतस्थळ: http:/www.dmer.org
क्र. संवैशिवसं/ गोद्री शिबीर / रिबर्थ / /२०२२ दि. १९.०१.२०२३
प्रति,
श्री. राजेश शेटटी,
अध्यक्ष,
रिबर्थ फॉउंडेशन,
पुणे.
विषय – गोद्री ता. जामनेर येथे दि. २५/०१/२०२३ ते दि. ३०/०१/२०२३ या दरम्यान आयोजित कुंभादरम्यान अवयवदानाबाबत जनजागृती करण्याकरीता सहभागी होणेबाबत…
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने, मा. ना. गिरीषजी महाजन, मंत्री वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय हिंदू- गौर बंजारा नायकडा या समाजाचा कुंभ (आरोग्य शिबीर) दि. २५.०१.२०२३ ते दि. ३०.०१.२०२३ या दरम्यान गोद्री ता. जामनेर, जि. जळगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबीराकरीता देशभरातील समाजबांधव व भाविक मोठया प्रमाणात एकत्र येणार आहेत. भाविकांमध्ये व समाजामध्ये अवयवदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.-
तरी आपणांस विनंती करण्यात येते की, सदर वैद्यकीय शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना अवयवयदानाबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्याकरीता आपल्या फाउंडेशनच्या प्रतिनिधी / वैद्यकीय पथक यांमार्फत सदरील वैद्यकीय शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्यात यावा. तसेच, जनजागृती करीता आवश्यक असणारे पोस्टर्स व दर्शक फलके आपल्या मार्फत उपलब्ध करण्यात यावी हि विनंती.
(डॉ. अजय साहेबराव चंदनवाले)
सहसंचालक (वैद्य),
वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई