This is no time for ease and comfort… It is time to dare and endure. (Marathi)

जिद्द पाहिजे जिंकण्यासाठी, हरण्यासाठी तर फक्त भीतीच पुरेशी असते.

जिद चाहिये, जीतनेके लिये।

हारने के लिये तो एक डर हि काफी है॥

प्रितीच्या जिद्दीची कमाल,

सरळ रस्ता असो की घाट

ऊन-पाऊस, वारा-गारा ,

अडवू शकणार नाही वाट॥

प्रिती भारतीय सिलिकॉन व्हॅलीत प्रवेश करायला आतुर 

नवव्या दिवसाचा एकूण प्रवास – २४०-२५० कि.मी.

सायकलवरील एकूण वेळ – जवळजवळ १८-१९ तास 

रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे –  भूथपुर, पुल्लूर 

आतापर्यंत पार केलेली राज्ये – जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा 

प्रितीने सलग नवव्या दिवशी जोमाने सायकलवारीची सुरवात केली. तेलंगणहून कर्नाटकात प्रवेश तर झाला पण एक नवे आव्हान पुढे ठाकले, वेडे वाकडे वाहणारे वारे(cross wind)! अशा वेळी सायकलच्या वेगावर खूप मर्यादा येतात. 

उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी टिम तिच्यावर वारंवार गार पाणी ओतत आहे. जी विश्रांती ती पहाटे ३-४ वाजता घेत होती ती थोडी लवकर घेऊन सकाळी लवकर प्रवासाला सुरवात करत आहे. 

रस्ता जरी चांगला असला तरी वाहनांची गर्दी भरपूर होती. सकाळी नऊ ते दुपारी चार-पाच वाजेपर्यंत खूप तीव्र ऊन असल्याने   दुपारच्या  वेळातच विश्रांती घेण्याचे ठरले. दिवसभरात तिनेक तास विश्रांतीत गेला. दुपारचे जेवण रस्त्यावरील एका ढाब्यावर घेतले. 

संध्याकाळी आंध्र प्रदेश कर्नाटक महामार्गावर आंध्र प्रदेश पोलीसांनी तिला आणि मागील सपोर्ट गाडीला पाहिले. त्त्यांना जेव्हा माहीत पडले की प्रिती काश्मीरवरून सायकल चालवत आली आहे तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. प्रितीच्या अवयवदानाच्या प्रसार मोहिमेला त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि थोडा वेळ ते प्रिती बरोबर चालत होते. 

टिम प्रितीचा उत्साह वाढवण्यासाठी गाणी म्हणणे, उत्साहवर्धक घोषणा देणे, रात्री गप्पा मारणे जे जे शक्य आहे ते ते  करतच आहे. 

आता प्रितीच्या मोहिमेचा शेवटचा अंक सुरु झाला आहे. लवकरच मोहिमेची यशस्वी वार्ता आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत 

कही मत जाईये 

मिलते है एक छोटेसे ब्रेक के बाद 

STAY TUNED!!

शब्दांकन – कविता पिपाडा

X