Twinkle Twinkle ReBirth Star
आज ९ फेब्रुवारी. काकांचा म्हैसूर मधला दुसरा दिवस.
म्हैसूरमधील उदयवाणी (Udayavani), आंदोलन (Andolana) आणि Indian Express या पेपर्स नी काकांच्या ८ तारखेच्या मुलाखतीला मोठठी प्रसिद्धी दिली.
‘Be an organ donor!’
‘अवयव दानासाठी स्वयंप्रेरीत व्हा आणि दुसऱ्यांनाही प्रेरीत करा!’
‘एक मेंदूमृत (Brain dead) व्यक्ती 8 जणांना जीवदान देऊ शकते ‘
हा संदेश म्हैसूरच्या घराघरात पोहोचला.
दुपारच्या सत्रात RED FM 93.5 च्या RJ दीपक यांनी त्यांच्या खास शैलीत काकांची मुलाखत घेतली आणि काकांचा आवाज रेडिओवरून सर्वदूर पोहोचला.
काका म्हैसूरच्या कार्यक्रमात व्यस्त असताना वाराणसीच्या ‘साधना Foundation’ मधून सौरभ यांचा काकांना फोन आला. Organ Donation जनजागृतीच्या कार्याबद्दल ‘ReBirth’ संस्थेला ‘साधना Foundation’ चा २०२० चा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी काकांना कळली तेव्हा काका खूप आनंदीत झाले. भारत ऑर्गन यात्रेच्या २०१९ सालच्या प्रवासात काका वाराणसीला सौरभ यांच्या घरी राहिले होते. काकांचं नि त्यांचं वडील–मुलाचं नातं जोडलं गेलं.
काका आत्तापर्यंत जिथे जिथे गेले, तिथे तिथे त्यांनी अशी नाती निर्माण केली, ती टिकवली आणि ReBirth संस्थेची ओळख महाराष्ट्राबाहेर पोहोचली.
ReBirth सारख्या पुण्यातील छोट्या संस्थेने Mileage Munchers ग्रुप च्या मदतीने ‘भारत ऑर्गन यात्रेचं‘ जे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केलाय याची सफलता या अश्या माध्यमातून साकार होत आहे.
NOTTO (National Organ & Tissue Transplant Organisation) या संस्थेने ReBirth च्या नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यातील जागृतीच्या केलेल्या कामगिरीची विशेष दखल घेऊन ReBirth टीमला धन्यवाद दिले.
- Total Events: 66
- ReBirth Talks Sessions: 29
- Digital Reach: 6.60 Lakh people
Dr Gajiwala (Director, ROTTO Maharashtra) यांचे ReBirth विषयीचे गौरवोद्गार – “You do our state proud!” खूप काही सांगून जातात!
अशी शाबासकीची थाप पाठीवर मिळाली की ReBirth च्या प्रत्येक कार्यकर्त्याची उमेद दुपटीने वाढते आणि अजून मोठ्ठं काम करायला आमचे कार्यकर्ते पुढे सरसावतात आणि ओठावर शब्द येतात..
“Twinkle Twinkle ReBirth Star”
How I wonder what you are!
काकांच्या प्रवासाबरोबर ReBirth चे ऋणानुबंध आणि ओळख भारतभर पोहोचते आहे . आता यापुढील मुक्काम Bengaluru.
Day 23
Mysore, Karnataka
Asmita Phadke – Tatke
Add Comment