Wearing ReBirth Captain’s Hat!

१३ फेब्रुवारीचा दिवस उजाडला. काका आणि Dr. Gopikrishnan सकाळी सकाळी Tharamangalam गावातून एक फेरफटका मारून आले. Dr. Gopikrishnan यांनीच बनविलेला ‘home made’ नाष्टा झाला.

सकाळी १० वाजता मिडीया आणि न्यूज पेपर्स चे लोक interview साठी येणार होते. काका आणि Dr. Gopikrishnan तयार झाले

Dr. Gopikrishnan यांनी ReBirth च्या प्रेसेंटेशन PPT ची पुन्हा एकदा उजळणी केली.

त्यांच्या आयुष्यातला हा पहिलाच interview! काकांमुळे आणि ReBirth या संस्थेमुळे त्यांना मिळालेली ही एक संधी होती

ReBirth ही अशी अनोखी NGO आहे जिथे तुम्ही एखादी activity / project / event सुचविला आणि ती idea सर्वांना पटली की तुम्हालाच लगेच त्या इव्हेंटसाठी Captain ची hat घातली जाते आणि मग ओघानेच सर्व धुरा तुम्हाला सांभाळायची असते!

आजच्या ReBirth च्या Tharamangalam इथल्या इव्हेंटचे कॅप्टन ओघानेच Dr. Gopikrishnan बनले. स्वयंप्रेरीत होऊन, स्वतः efforts घेऊन!

Sathiyam, Vasanth News and local news पेपर्स चे लोक आले. Interview चं ठिकाण गावाच्या मुख्य रस्त्यावर ठरविलं, जेणे करून येणारे जाणारे जास्तीत जास्त लोक थांबून ऐकतील.

Dr Gopikrishnan नी ReBirth विषयी आणि Organ Donation विषयीची त्यांना समजलेली सर्व माहिती मिडीयाला दिली. काकांनीपण जमेल त्या भाषेत माहिती दिली. काकांची Organ Donation विषयीचे slogans असणारी bike सुद्धा खूप काही सांगून जाते.

Interview छान पार पडला!

त्या नंतरही गावात ठिकाणी जाऊन Dr Gopikrishnan आणि काकांनी जमेल तेवढ्या लोकांशी संपर्क साधला आणि organ donation ची गरज का आहे हे लोकांना सांगितलं

स्वतःचा अभिमान वाटावा असे काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच असे नाही, पण मिळालीच तर just go ahead and grab it! 

Dr Gopikrishnan साठी आजचा क्षण अभिमानाचा होता. त्यांनी त्याचं सोनं केलं

‘Organ Donation साठी स्वयंप्रेरीत व्हा आणि दुसऱ्यांना प्रेरीत कराहा ReBirth चा संदेश त्यांनी प्रत्यक्ष आमलात आणला.

ReBirth चं काम भारतभर पोहोचविण्यासाठी आणि organ donation चं महत्त्व पटवून देण्यासाठी Dr Gopikrishnan सारखे कार्यकर्ते ठिकठिकाणी तयार होतील अशी आशा करूयात

काका आणि Dr Gopikrishnan आज खूप खूष होते.

“Proud to be with him!” असा फलक लावून काकांचा एक फोटो त्यांनी स्वतःसाठी काढून घेतला.

संध्याकाळी दोघेही Tharamangalam येथील प्राचीन शिवमंदिर आणि शिव रथाचे दर्शन घेऊन आले.

आज काकांसाठी खास डोसा, उत्तपम चा बेत होता. Gopikrishnan आणि त्यांचे एक स्नेही काकांना गरमगरम डोसा स्वतःच्या हाताने बनवून वाढत होते

रात्री फोनवरून त्या दोघांशी संवाद साधला तेव्हा दोघेही दिवसभरात घडलेल्या घटनांबद्दल भरभरून बोलत होते.
Gopikrishnan काकांबद्दल, ReBirth संस्थेबद्दल कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना व्यक्त करीत होते.
भाषेच्या पलीकडचा तो भावनांचा संवाद खूप बोलका होता.

Captain Gopikrishnan, salute to your today’s captainship and commitment towards organ donation awareness, a noble cause!

Organs साठी प्रतिक्षेत असणाऱ्या कित्येकांसाठी असे अनेक स्वयंप्रेरीत Gopikrishnan तयार होणे आज काळाची गरज आहे

Day 27 
Salem, Tamil Nadu
~Asmita Phadke -Tatke

Add Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

X