पडदा तर उघडला, आता करूया पात्र परिचय.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।
निश्चयाचा महामेरू म्हणजे केलेल्या निर्धारावर एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे ठाम राहणारा.
प्रिती म्हस्के आणि तिचा चालक दल प्रत्येक अडथळ्यासाठी सुसज्ज
प्रतिकूल हवामानातही मोहीम तडीस जाणार याची टीमला खात्री.
When Bucket list becomes Bikeit list
पडदा तर उघडला, आता करूया पात्र परिचय.

आपली नायिका प्रिती
या मोहिमेद्वारा प्रितीला फक्त काश्मीर ते कन्याकुमारी सायकल हा विक्रम करायचा नाहीये तर १५ ते २० कोटी लोकांपर्यंत अवयव दानाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे जेणेकरुन गरजूला वेळेत अवयव मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत. ह्या जनजागृती मोहिमेसाठी तिच्या बरोबर तिचे मावळे अर्थात चालकदल देखील सुसज्ज आहेत …मोहिमेत काही सदस्य नंतर सामील होणार आहेत त्यांची ओळख कालांतराने होइलच. तर भेटूया आताच्या टीमला

१. आनंद कसाल
तीन दशकाहून अधिक काळ प्रसार माध्यमामध्ये जवळून काम करणारे, या मोहिमेचा महत्त्वाची भूमिका वठवणारे आहेत. स्वतःसायकलपटू असल्याने त्यांना मोहिमेचे स्वरुप, त्यासाठी लागणारी पुर्वतयारी, शारीरीक व मानसिक बळ याची पूर्ण माहिती आहे. यापूर्वी त्यानी प्रितीची लेह ते मनाली सायकल मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यास मदत केली आहे. प्रितीबरोबर अगदी सहज भेटीत हि कल्पना सुचली आणि त्यांनी या योजनेची अंमलबजावणी करायला सुरुवात केली.

२. कर्नल राजेश दत्ता
कर्नल राजेश हे सप्टेंबर २०१७ मध्ये भारतीय सैन्यातून निवृत झाले आहेत.
कर्नल प्रितीला टूर द कैलाश या उत्तरालखंड मध्ये झालेल्या सायकल मोहिमेत सर्वप्रथम भेटले आणि प्रितीची लेह ते मनाली ह्या पायी मोहीमेत सहभागी होते. ते म्हणतात, फक्त स्त्री आहे म्हणून तिला कोणतेही बंधन नाही आणि नसावेत.

३. मोहन भंडारी
सहा फुट उंच धाड धिप्पाड सायकलपटू, गिर्यारोहक, मॅरॉथॉन धावपटू चालक दलात छायाचित्रकार(फोटोग्राफर), प्रितीचा पाठीराखा (सपोर्टर) आहे. मूळचे अल्मोड़ा येथील निवासी असून साहसप्रेमी आहेत.

४. संदिप शेलार
पुण्याजवळील ऊरळी कांचनचे राहणारे चाकांच्या मागे राहून प्रितीला वेळोवेळी गाड्या आणि रहदारीपासून सुरक्षित ठेवणारे अत्यंत महत्वाचे सदस्य.
अशा धाडसी मोहिमेत सहभागी होणे ही त्यांची आवड आहे. प्रितीला सायकल चालवत असताना केवळ हॉर्न आणि लाईट ह्याच्या सांकेतीक भाषेने सूचना देत असतात आणि सावध करत असतात.

६. ऋतुजा म्हस्के
व्यवसाने अभियंता असून अमेझॉन या कंपनीत काम करणारी ऋतुजा प्रितीची लाडकी कन्या. आईला अशा खडतर मोहिमेत खंबीर साथ देणारी, तिचा उत्साह वाढवणारी मुलगी जगावेगळीच!! ऋतुजा आईसाठी मानसिक आणि भावनिक आधार असेल.
काश्मीरला पाहिला दिवस
प्रिती आणि चालक दलाचा पहिला दिवस भेटींनी गजबजलेला होता. जे अँड के रहदारी पोलीस अधिकारी, पत्रकार, स्थानिक लोक, चाकू क्राफ्टचे श्री असीम, डेप्यूटी डायरेक्टर वासिम मलिक यांच्याशी भेट झाली.

हिमवर्षावात न्हालेले श्रीनगर, भुरभुर पडणारा पाऊस, रस्त्यात असलेले खड्डे (?) की खड्ड्यात असलेला रस्ता, दोन बोगद्यात झालेले भूस्खलन या कारणांमुळे रस्ते बंद होते. प्रितीसाठी असा अवघड रस्ता पार करण्यासाठी MTB सायकलीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुर्दैवाने मोहीमेचा शुभारंभ होऊ शकला नाही. सगळयांनी रस्ता नजरेखालून घातला आहे आणि मार्गात काय काय अडथळे येतील हे ते जाणून आहेत. पण सगळ्यांचे मनोबल एकदम प्रबळ आहे आणि हा लेख तुम्ही वाचण्यापूर्वी या ऐतिहासिक मोहिमेची सुरुवात झालेली असेल.

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…
झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
काट कुट वाट मंदी बोचती त्येला
रगत निगल तरी बी हसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची…
शब्दांकन – कविता पिपाडा